Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी १६५० रुपये अग्रीम; विमा कंपनीचा अहवालावर आक्षेप

Amravati News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी १६५० रुपये अग्रीम; विमा कंपनीचा अहवालावर आक्षेप

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पावसाचा खंड पडल्याने विमा परताव्याचे २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जारी झाली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmer) अल्प परतावा मिळणार आहे. विमा कंपनीने नुकसानीच्या अहवालावर (Amravati) आक्षेप घेण्यास सुरुवात केली असून अधिकाधिक पंचनामे फेटाळण्यावर त्यांचा जोर आहे. सरासरी एकरी १६५० रुपये अग्रीम मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ४१ महसूल मंडळात पावसाने खंड दिल्याने सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी उत्पादन होण्याचा अहवाल जिल्ह्याच्या संयुक्त समितीने दिला आहे. महिनाभरात २५ टक्के अग्रिमची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे बंधनकारक आहे. मात्र विमा कंपनीने (Insurance Company) संयुक्त समितीच्या अहवालावर आक्षेप दाखल करण्यास सुरुवात केली आहे. 

या आक्षेपात नुकसानीची काढलेली सरासरी मान्य नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे. आता या आक्षेपावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सुनावणी करण्यात येईल. त्यानंतरही आक्षेप कायम राहिल्यास राज्यस्तरावर आक्षेप दाखल करण्यात येतील. तेथील निर्णय काय येतो, यावर अग्रीम देणे अवलंबून राहणार आहे. या प्रक्रियेत बराच कालावधी निघून जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT