Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

कापसाला ऐतिहासिक दर; ११ हजार ८४५ रुपये क्विंटल

कापसाला ऐतिहासिक दर; ११ हजार ८४५ रुपये क्विंटल

जयेश गावंडे

अकोला : गेल्या पन्नास वर्षांनंतर पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाला आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीमध्ये कापसाला ११ हजार ८४५ मिळाल्याने आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. मात्र या भावाचा फायदा व्यापाऱ्याला की शेतकऱ्याला असा प्रश्न शेतकरी (Farmer) विचारत आहेत. (akola news Historical rates for cotton in akot bajar samiti)

बोन्ड अळी, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात कापूस (Cotton) उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तर देशातील महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. मात्र यावर्षी कापसाला मिळत असलेला सर्वोच्च दर त्यामुळे येणाऱ्या काळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला राहू शकतो. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाचे भाव दररोज तेजीकडे वाटचाल करणाऱ्या पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे

अकोल्यातील (Akola) अकोट बाजार समिती ही कापसाची मोठी बाजारपेठ समजली जाते. येथील कापसाची लिलाव पद्धत यामुळे देखील शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे वऱ्हाडातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा या बाजार समितीकडे असतो. कापसाला ऐतिहासिक आणि विक्रमी दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येणारा काळ हा पांढऱ्या सोन्याला पिवळ्या सोन्यापेक्षाही चांगला भाव देणारा ठरो तरच बळीराजाला अच्छे दिन येतील यात शंकाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Tourism : थंडगार वातावरण अन् अ‍ॅडव्हेंचर, वीकेंडसाठी परफेक्ट आहेत खोपोलीतील 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

साखरपुड्यानंतर गावी आला, तरुणाला टोळक्यांनी गाठलं, धारदार शस्त्रांनी सपासप वार, पहाटे नेमकं झालं काय?

Weight loss: वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, Weight Loss करत असाल तर या ४ चुका टाळा

SCROLL FOR NEXT