Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News: हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; पुन्हा एक लाख क्विंटल हरभरा होणार खरेदी

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; पुन्हा एक लाख क्विंटल हरभरा होणार खरेदी

जयेश गावंडे

अकोला : जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारित रब्बी हंगाम २०२२-२३ अतंर्गत नाफेडमार्फत जिल्ह्याला (Akola) आणखी एक लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आल्याचे राज्य शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. (Maharashtra News)

यापूर्वीही १९ एप्रिल रोजी उद्दिष्ट संपल्यावरून खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. खाजगी बाजारात हरभऱ्याला कमी दर मिळत असल्याने राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर अकोला जिल्ह्याला नव्याने ९१ हजार ९१४ क्विंटल वाढीव उद्दिष्ट शासनाकडून २७ एप्रिल रोजी मंजूर करण्यात आले.

मात्र तरीही जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होणार का? हा प्रश्न ऐरणीवर असतांना जिल्ह्याला आणखी एक लाख क्विंटलचे उद्दिष्ट मिळाले आहे. शासनाकडून आज एक लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT