akola saam tv
ऍग्रो वन

Akola News : कृषी विभागाची माेठी कारवाई, 18 कोटींच्या खते, बी-बियाण्यांवर विक्रीबंद आदेश

शेतक-यांनी कृषि निविष्ठा विक्रेत्याबाबत तक्रार असल्यास कृषी विभागात संपर्क करावा.

जयेश गावंडे

Akola News : आगामी खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध व्हाव्या याकरिता किटकनाशके साठवणूक स्थळांची तपासणीसाठी मोहिम राबविण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले होते. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात पथके स्थापन करुन दोन दिवसात 63 गोदामांची तपासणी करण्यात आली आहे. (Maharashtra News)

यामध्ये 134 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्यापैकी 36 कंपन्यांचे 18 कोटी 82 लाख 6 हजार किमतींच्या निविष्ठांची विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी मोहिममध्ये काही कंपन्यांच्या गोडावून मालकांनी कंपनीचा बोर्ड न लावणे, साठा नोंद वही अद्यावत न ठेवणे, कायद्यातील तरतुदीप्रमाणे लेबल नसणे, काही उत्पादनाचा समावेश परवान्यामध्ये नसणे, साठवणूक स्थळाचा समावेश परवान्यामध्ये नसणे आदी कारणामुळे विक्रीबंद आदेश देण्यात आलेले आहेत.

सर्व शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात कोणतीही कंपनी अथवा कृषि निविष्ठा विक्रेता यांच्या बाबत तक्रार असल्यास कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT