सचिन बनसोडे
राहुरी (अहमदनगर) : गेल्या महिनाभरापर्यंत टमाट्याचे दर गगनाला भिडले होते. परंतु मागील काही दिवसापासून टमाट्याची (Tomato) आवक वाढली असून सध्या दर गडगडले आहेत. आता टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने (Farmer) शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुन्हा एकदा टमाटे फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Live Marathi News)
काही दिवसापूर्वी टोमॅटोने दराचा उच्चांक गाठला होता. या काळात टमाटे बाजारात दिसेनासे झाले होते. तर दर वाढल्याने स्वयंपाक घरातुन टमाटा देखील गायब झाला होता. मात्र आता उलट परीस्थीती झाली आहे. टोमॅटोला अगदी पन्नास पैसे ते दोन रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत.
भाव नसल्याने गायीला टाकले टमाटे
राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील सागर धांगट या होतकरू तरूण शेतकऱ्याने टमाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. आता टमाटे निघू लागले असताना, बाजारात कवलीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतातील टोमॅटोची गाईंना मेजवानी दिली. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.