शेती पंपाचा वीजपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन भारत नागणे
ऍग्रो वन

शेती पंपाचा वीजपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन

वीज वितरण कंपनीने थकीत वीजबिल वसुलीसाठी शेती पंपाचा वीज पुरवठा तोडला आहे. याविरोधात जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

भारत नागणे

पंढरपूर: वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपाचा वीज पुरवठा तोडला आहे. या अन्यायाविरोधात जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज सावरकरांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडी सरकारमधील तीन माकडांचे प्रदर्शन आंदोलन सुरू केले आहे. (An agitation of Janhit Shetkari Sanghatana demanding to start power supply to agricultural pumps)

हे देखील पहा -

मागील आठ दिवसांपासून थकित वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने शेती पंपाचा वीज पुरवठा तोडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकांचे नुकसान होत आहे. कोरोना काळात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याविरोधात जनहित शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.

शेती पंपाचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा अन्यथा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना शेतकरी हातात रुमणे घेऊन जाब विचारतील असा इशाराही प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT