Crime News, Bribe ,Latur, Chakur Saam Tv
ऍग्रो वन

Chakur News : शेतक-याकडून लाच घेताना विमा कंपनीचे कर्मचारी सापडले

या तक्रारीची शहनिशा करुन एसीबीनं सापळा रचला.

दीपक क्षीरसागर

Latur : सध्याला जिल्ह्यात शेतीचे पाऊस आणि किड रोगाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे पीक विमा कंपनीच्या वतीने सुरू आहेत. शेतक-याला (farmer) जास्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी साडेतीन हजाराची लाच (bribe) स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. आनंद मोहनराव कांबळे आणि संदीप जालिंदर बानाटे अस विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Maharashtra News)

चाकुर येथील पर्यवेक्षक आनंद मोहनराव कांबळे आणि संदीप जालिंदर बानाटे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतात जास्तीचे नुकसान झाले बाबत पंचनामा केला. या पंचनाम्याचा मोबदला म्हणून तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणे करीता सर्वोतोपरी मदत करण्यासाठी एकत्रितपणे तीन हजार पाचशे रुपयाची लाच मागितली.

त्यामुळं तक्रारदारानं एसीबी कार्यालयात तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा करुन एसीबीनं सापळा रचला. शेतक-याकडून जास्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचा-यांना साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीनं पकडलं. आनंद मोहनराव कांबळे आणि संदीप जालिंदर बानाटे असं लाच घेणा-या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT