आज पाहा

VIDEO | डोंगरावरून वाहतोय आगीचा धबधबा ?

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

...सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय...व्हिडीओत बघा, पाणी वाहत नाहीये तर आगीचा धबधबा वाहत असल्याचं दिसतंय...डोंगरावरून हा आगीचा धबधबा वाहतोय असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच आगीचा धबधबा असू शकतो का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...व्हिडीओ एवढा व्हायरल होतोय की दोन दिवसात 40 लाख लोकांनी पाहिला...पण, हा धबधबा नेमका आहे तरी कुठला...? आणि तो खरा आहे की खोटा...? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने या व्हिडीओमागचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...

आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने धबधबा पाहून लोक आश्चर्य व्यक्त करतायत...आगीचा धबधबा जगात कुठे आहे याची पडताळणी करण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली...याची माहिती मिळवत असताना अनेक माहिती समोर आली...त्यामुळं आमच्या पडताळणीत काय समोर आलं पाहा...


हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील एका धबधब्याचा आहे

हा धबधबा हॉर्सटेल फॉल या नावानं ओळखला जातो

दरवर्षी फेब्रवारी महिन्यात दोन आठवड्यासाठी नारंगी आणि लाल रंगाचा होतो 

सूर्याची किरणं सरळ रेषेत धबधब्यावर पडल्यावर  धबधबा लाल रंगाचा दिसतो


सूर्याची किरणं एवढी प्रखर असतात की धबधबा आगीसारखा दिसतो...कधी कधी तर धबधबा ज्वालामुखी सारखा दिसतो...आगीचा असा कोणताही धबधबा नाहीये...या धबधब्यातून पाणीच वाहतं...त्यामुळं आगीचा धबधबा असल्याचा दावा असत्य ठरला...

WebTittle :: A fiery waterfall flowing from the mountain?


 


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT