अजबच - लशीला विरोध, देवीला साकडे

Villagers in Gadchiroli oppsing corona vaccine
Villagers in Gadchiroli oppsing corona vaccine

गडचिरोली : या जिल्ह्यात Gadchiroli कोरोनाची स्थिती हाताळण्यात काय-काय अडचणी येत आहेत आणि अंधश्रद्धा Superstition त्यात कशी भर घालत आहे, याचं विदारक चित्र समोर आलंय. हा जिल्हा महाराष्ट्रातील आदिवासी व अतिदुर्गम जिल्हा आहे. कोरोना Corona साथरोग संकटाचा सामना संपूर्ण जग लसीकरणाद्वारे Vaccination करत आहे. मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या अंधश्रद्धा व चालीरीती यामुळे या जिल्ह्यातील जयरामपूर या गावाने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण थांबवून गावातील देवीला सात दिवस पाणी घालण्याचे ठरवलं. Villagers in Gadchiroli District opposing Corona Vaccine

या धक्कादायक घटनेनंतर आरोग्य खात्याने Health Department केलेल्या विनंत्या गावाने धुडकावून लावल्या. ही अंधश्रद्धा आता कशी दूर करायची, हा नवा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा टाकलाय. कोरोना साथरोग संकट जगभर पसरले असताना त्याचे पडसाद आदिवासी -मागास गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर गावात मात्र वेगळीच घटना बघायला मिळत आहे. गावात कोरोनाने शिरकाव केला. तापाची साथ पसरली.

हे देखिल पहा - 

आरोग्य खात्याने याची दखल घेतली आणि गावातील २० बाधितांना वेगळे केले. गावात लसीकरण सुरू झाले. मात्र अचानक गावाने सूर बदलला. आरोग्य पथकाला मनाई केली. आणि आजार दूर करण्यासाठी चक्क गावातील देवीला आठवडाभर पाणी टाकण्यासाठी महिलांनी आघाडी उघडली. हा रोग म्हणजे देवीचा प्रकोप असून, गावातील देवांची पुजाअर्चना केल्याने दूर होईल, असा त्यांचा समज झाला. 

कोरोना प्रकोप दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील देवी मरीमायला साकडे घालणे सुरू केले. त्यासाठी गावात दवंडी पिटली जातेय. त्यानंतर लोक मारीमयच्या मंदिरात येतात. हे सगळे प्रकार बघून आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी लस घ्या आणि उपचाराला प्रतिसाद द्या, अशी विनवणी केली. मात्र त्याला गावकऱ्यांनी धुडकावून लावलं. Villagers in Gadchiroli District opposing Corona Vaccine

गावात अशी साथ आली की देवीचा प्रकोप झाल्याचा समज अजूनही दुर्गम, मागास आणि आदिवासीबहुल भागात बघायला मिळतोय. अंधश्रद्धेचे भूत मानेवरून उतरवून जयरामपूरने लसीकरण व आरोग्य खात्याच्या नियमांना साथ दिल्यास त्यांचेच भले होणार, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.  
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com