VIDEO | आरएसएस आणतीय नवीन भारतीय राज्यघटना?

VIDEO | आरएसएस आणतीय नवीन भारतीय राज्यघटना?

नागरिकत्व कायद्यावरून देशातलं वातावरण ढवळून निघालंय. कुठे या कायद्याच्या विरोधात तर कुठे समर्थनात मोर्चे निघतायेत. अशातच एका व्हायरल मेसेजनं सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. या मेसेजमध्ये आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशासाठी नवी राज्यघटना आणतंय असं म्हंटलंय. पाहूयात या व्हायरल मेसेजमध्ये नेमकं का म्हंटलंय. 


भारताची नवी राज्यघटना हिंदू धर्मावर आधारीत असेल. या राज्यघटनेनुसार भारताला हिंदू राष्ट्र घोषित केलं जाईल आणि भारताऐवजी हिंदुस्थान हा शब्द वापण्यात येईल. प्रत्येकाला समान नागरी अधिकार असणार नाही, सर्व जाती-धर्मांचं चार वर्णात विभाजन केलं जाईल. 
 अशा आशयाचा मेसेज वेगानं व्हायरल होत असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा मेसेज नेमका कुणी पाठवलाय? खरंच अशी नवी राज्यघटना लागू होणार आहे का ? याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या प्रतिनिधींनी थेट नागपूरच्या संघ कार्यालयाशी संपर्क केला. तेव्हा हा मेसेज चुकीचा असल्याची माहिती समोर आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावानं सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकणाऱ्यां विरोधात संघाकडून नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. 

'भारत का नया संविधान' अशा आशयानं सोशल मीडियात फिरत असलेला मेसेज खोटा आहे. या प्रकरणाशी संघाचा कुठलाही संबंध नाही. अज्ञात व्यक्तींकडून हा खोडसाळपणा करण्यात आलाय. 

त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर अजिबात विश्वास ठेवू नका.. गैरसमज पसरवण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात. आमच्या पडताळणीत नव्या राज्यघटनेबाबतचा मेसेज असत्य असल्याचं समोर आलंय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com