#VIRALSATYA | पैलवान माशाची पाण्यात अशी दादागिरी !

#VIRALSATYA | पैलवान माशाची पाण्यात अशी दादागिरी !

शत्रू हल्ला करायला आला की तो सावध व्हायचा. अनेकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण,कुणालाही ते जमलं नाही. आम्ही तुम्हाला एका पैलवान माशाबद्दल सांगत आहोत. असा कोणता हा मासा आहे जो शत्रूलाही सहज चकवा देतो? चला पाहुयात 

तुम्ही अनेक मासे पाहिले असतील. पण, हा मासा पाहून तुम्हाचा विश्वासही बसणार नाही. नक्की बॉल आहे की मासा असाच प्रश्न तुम्हाला पडेल.पण, नीट पाहिलं तर हा बॉल नसून मासा असल्याचं कळतं. या माशानं पाण्यात शत्रूलाही वेडा करून सोडलंय.पटकन आकार बदलत असल्यानं या माशाच्या नादाला कुणीही लागत नाही. पण, हा मासा आपला आकार कसा काय बदलतो? असे अनेक प्रश्न विचारले जातायत. त्यामुळं या माशाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

ब्लो फिश नावानेही हा मासा ओळखला जातो. माशाचा आकार वाढत असल्याने मासा बॉलसारखा दिसतो. पोटवरकरून पाण्यावर तरंगायला लागतो. हल्ला करायला आलेल्या माशालाही वाटतं की हा मासा मेलाय. पण, शत्रूपासून बचाव करण्यासाठी पफर मासा आपला आकार बॉलसारखा करतो. हल्ला करणारा मासा निघून गेल्यावर मासा आपल्या शरीरातील हवा किंवा पाणी बाहेर काढतो. आणि मूळ आकारावर येतो. पफर मासा असं या माशाचं नाव आहे. माशाला धोका असतो तेव्हा तो आपल्या शरीरात हवा किंवा पाणी भरतो. पफर माशाच्या पोटात विशिष्ट प्रकारचे कप्पे असतात. शरीराच्या आकारापेक्षा तो 40 टक्के आकार वाढवू शकतो. आकार बदलून मासा शत्रूपासून बचाव करतो. उष्ण आणि सम शितोष्ण कटीबंधात हा मासा आढळत असून, या माशाच्या एकूण 90 प्रजाती आहेत .या माशाच्या दातांची रचना चकतीसारखी असल्यानं तो काहीही खाऊ शकतो.  माशाच्या नादी कोणताच मासा लागत नाही. त्यामुळं या आगळ्या वेगळ्या माशाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होतेय.

Web Title - viral sartya special report of puffer fish

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com