नितीश कुमारांकडून RSSची हेरगिरी ?

नितीश कुमारांकडून RSSची हेरगिरी ?

बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपमध्ये  पुन्हा एकदा काजयी तणाव वाढलाय. त्याला कारण ठरलीय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार पोलिसांच्या स्पेशल ब्रांचला लिहिलेली चिठ्ठी. मोदी सरकार-2 च्या शपथविधीच्या दोन दिवस आधी म्हणजे २८ मेला लिहिलेल्या या चिठ्ठीत आरएसएस आणि त्यांच्या संबधीत संघटनांची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते. यावरुन नितीश कुमार आरएसएसची हेरगिरी करत आहेत का? नितीश कुमारांचा भाजपवर विश्वास उरला नाही, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायेत का? असे अनेक प्रश्न विचारले जातायत.  

बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपमधला राजकीय तणाव तसा नवा नाही. लोकसभा निवडणुकीआधी अनेक मुद्यांवरुन दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद होते. लोकसभा जाहीरनाम्यात भाजपनं कलम 370 आणि राममंदिर मुद्याचा समावेश केला होता. जेडीयूने मात्र हे मुद्दे साईड लाईन केले होते. लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजप एकत्र लढवली. दोन्ही पक्षांनी समसमान म्हणजे 17-17 जागा लढवल्या. यापैकी जेडीयूनं 17 तर भाजपनं 17 जागांवर विजय मिळवला. जेडीयूच्या हिस्याच्या  एका जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला. 

भाजपच्या तुलनेत जेडीयूला मिळालेली एक कमी जागा नितीश कुमारांच्या पचणी पडलेली नाही. असंही सांगितलं जातंय की मोदी सरकार-2 मध्ये जेडीयूने तीन मंत्रिपदं मागितली भाजप मात्र एकच मंत्रिपद देण्याची तयारी दाखवले. यावरुन नाराज नितीश कुमारांचा जेडीयू मंत्रिमंडळात सहभागी झाली नाही. विशेष म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार सरकारविरोधात जनमत आहे. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com