Surabhi Jayashree Jagdish
आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला पराभूत करून मोठा धक्का दिला आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा स्विकारली.
या सामन्यात बुमराहने उत्तम कर्णधारपद भूषवलं तर शार्दुल ठाकूरने सामन्यात चार बळी घेतले. पंजाबविरुद्धच्या विजयानंतर शार्दुलने हार्दिक पांड्याच्या कमबॅकबद्दल माहिती दिलीये. शार्दूलच्या सांगण्यानुसार, केकेआरविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याचं कमबॅक होऊ शकतं.
हार्दिक पांड्याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाठीचा त्रास झाला होता . यामुळे हार्दिक गेल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. पंजाबविरूद्धचा सामना धर्मशालामध्ये खेळवला गेला. त्यावेळी पंड्या टीमसोबत रवाना झाला नाही. मात्र त्याने मुंबईत सराव केला असल्याची माहिती आहे.
पंजाबविरूद्धच्या विजयानंतर शार्दुल ठाकूर हार्दिकबद्दल म्हणाला, दुखापतीमुळे हार्दिक आमच्यासोबत प्रवास करू शकलेला नाही. तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी रायपूरला गेला होता पण खेळू शकला नाही. तो सध्या मुंबईत सराव करत असून, पुढच्या बुधवारी २० मे रोजी केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. आमच्या टीममध्ये त्याच्यासारख्या खेळाडूची नेहमीच गरज असते.
मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली या सिझनमध्ये नऊ सामन्यांमध्ये फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यानंतर सूर्यकुमार यादवने टीमला दोन सामन्यांमध्ये एक विजय मिळवून दिला. तर बुमराहने त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच सामन्यात चौथा विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये १२ सामन्यांमधून चार विजय आणि आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. जरी मुंबईने त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले तरीही त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होणार आहेत. जे प्लेऑफसाठी पुरेसे नसतील. मुंबई आता या सिझनमधील शेवटचा सामने २० मे रोजी केकेआरविरुद्ध आणि त्यानंतर २४ मे रोजी आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.