Surabhi Jayashree Jagdish
उंच टॉवर, इमारती आणि धुराडे यांची माहिती वैमानिकांना वेळेवर मिळावी म्हणून त्यांच्या माथ्यावर लाल दिवा बसवला जातो. रात्री किंवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत हा दिवा अडथळ्याचा स्पष्ट इशारा देतो. त्यामुळे वैमानिक योग्य अंतर राखून विमान सुरक्षितपणे उड्डाण करू शकतात.
लाल रंगाचा प्रकाश इतर रंगांच्या तुलनेत अधिक लांब अंतरावरून सहज दिसतो. पाऊस, धुके किंवा कमी प्रकाशातही हा दिवा स्पष्टपणे ओळखता येतो. त्यामुळे वैमानिकांना संभाव्य अडथळ्याची पूर्वसूचना मिळून अपघाताचा धोका कमी होतो.
रात्री शहरांमध्ये अनेक प्रकारचे दिवे असतात. अशा परिस्थितीत लाल दिवा इतर प्रकाशापेक्षा वेगळा आणि ठळक दिसतो. त्यामुळे वैमानिकांना उंच गोष्टी दूरवरूनच सहज ओळखता येते.
पांढऱ्या रंगाचा तीव्र प्रकाश रात्री मानवी डोळ्यांच्या नैसर्गिक 'नाइट व्हिजन'वर परिणाम करू शकतो. लाल प्रकाशाचा हा परिणाम तुलनेने कमी असल्यामुळे विमान वाहतुकीत त्याचा वापर अधिक केला जातो.
पूर्वी अनेक टॉवरवरील दिवे प्रभावी नसल्याने पक्ष्यांची टॉवरवर धडक होण्याची शक्यता अधिक होती. अनेक पक्षी रात्री ताऱ्यांच्या आधारे दिशा ठरवत असल्याने उंच गोष्टी त्यांना धोका निर्माण होतो.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षेच्या नियमांनुसार ठराविक उंचीपेक्षा जास्त असलेल्या संरचनांवर असे दिवे लावणं आवश्यक असतं. या नियमांचा उद्देश विमानांना संभाव्य अडथळ्यांची स्पष्ट माहिती देणं हा आहे.
टॉवरवरील लाल दिवा अनेक ठिकाणी सतत किंवा नियमानुसार अखंड कार्यरत ठेवला जातो. वीजपुरवठा खंडित झाल्यासही तो बंद पडू नये म्हणून बॅकअप इलेक्ट्रिक सिस्टीम बसवली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.