Manasvi Choudhary
आयएएस अधिकारी टीना डाबी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा टीना डाबी यांनी आपल्या कामामुळे लक्ष वेधून घेतलं आहे. त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.
नुकतंच टीना डाबी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते ' कॅच द रेन अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग' या मोहिमेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
जलसंवर्धनाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बाडमेर जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला आहे. दोन कोटी रूपये बक्षीस पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
टीना डाबी या बारमेरच्या जिल्हाधिकारी आहेत. बारमेर हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी पारंपारिक पद्धतीने ' कॅच द रेन अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग'ही व्यापक मोहिम सुरू केली .
भारताच्या बारमेर सारख्या दुष्काळग्रस्त भागात त्यांनी पाणी साठवण्याची ही मोहिम सुरू केल्याने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत टीना डाबी यांनी बाडमेर जिल्ह्यात पावसाचे पाणी वाचवण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधण्याचे काम केले. बारमेर जिल्ह्यात सुमारे ८७,००० पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
गावागावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या ज्यामुळे पाण्याची मोठी साठवणूक झाली. या मोहिमेमुळे गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या महिन्यानंतर जवळजवळ तीन ते चार महिने स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच त्यांनी या मोहिमेअंतर्गत गावांमधील तलाव, नद्या यामध्ये पावसाचे पाणी साठण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
टीना डाबी यांच्या कॅच द रेन या मोहिमेमुळे बारमेरला पावसाळी पाणी संवर्धनात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे देशभरात मान्यता मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.