First step if phone hacked: तुमचा फोन हॅक झाला तर पहिली गोष्ट कोणती करावी? जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

फोन हॅक

तुमचा फोन हॅक झाल्यास योग्य ती पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे ही बाब हलक्यात घेऊ नये.

आर्थिक नुकसान

पहिल्यांदा बँक, क्रेडिट कार्ड कंपनी आणि इतर आर्थिक गोष्टींशी संपर्क साधा. तुमच्या खात्यांमध्ये काही गडबड झाली का ते तपासा. यामुळे आर्थिक नुकसान टाळता येईल.

पासवर्ड त्वरित बदलणं

दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे सर्व पासवर्ड त्वरित बदलणं. नवीन आणि स्ट्राँग पासवर्ड वापरा. फोनशी जोडलेल्या सर्व अॅप्स आणि वेबसाइट्ससाठी हे करणं आवश्यक आहे.

अॅप्सची तपासणी

फोनमधील सर्व अॅप्सची तपासणी करा. संशयास्पद किंवा अनोळखी अॅप्स लगेच काढून टाका. फोन रीस्टार्ट करून पुन्हा तपासा.

मालवेअर अॅप्स

जर फोनमध्ये सतत पॉप-अप्स किंवा मालवेअर अॅप्स दिसत असतील आणि काहीच उपाय काम करत नसेल तर फोनला फॅक्टरी सेटिंगवर रीसेट करा. मात्र हा उपाय शेवटचा पर्याय म्हणून वापरा, कारण यात तुमचा सर्व डेटा डिलीट होतो.

फोन हॅक झाल्याची माहिती

तुच्या मित्रांना आणि कॉन्टॅक्ट्सना फोन हॅक झाल्याची माहिती द्या. त्यांना सावध करा की तुमच्या फोनवरून आलेले संशयास्पद मेसेजेस डिलीट करावेत. यामुळे त्यांनाही धोका टाळता येईल.

सायबर सेल

जर तुम्हाला फोन हॅक झाल्याचा संशय असेल, तर सायबर एक्सपर्ट किंवा सायबर सेलशी संपर्क साधा. जर आर्थिक नुकसान झालं असेल किंवा डेटा लीक झाला असेल, तर त्वरित सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवा.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा