Chetan Bodke
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते.
मुनमुन अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. चित्रपट आणि मालिकांमधून तिने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताच्या फॅशनची सोशल मीडियावर नेहमीच जोरदार चर्चा होत असते.
नुकतंच बबिताने चाहत्यांसोबत एक हटके फोटोशूट शेअर केले आहे.
मुनमुनने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये लाल रंगाचा घागरा परिधान करत खूप सुंदर फोटोशूट केले.
रेड कलर असलेल्या ह्या घागऱ्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
डोक्यावर बिंदी, ड्रेसला साजेसा गळ्यामध्ये नेकलेस परिधान करत मुनमुनने सुंदर फोटोशूट केले आहे.
मुनमुनच्या ह्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.
मुनमुनने 'हम सब बाराती' या मालिकेतून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.