Sunday Horoscope: ‘या’ राशी चारचौघात कमावणार कौतुक, तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; जाणून घ्या रविवारचे खास राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

नव्याने ओळखी आणि परिचय होण्यासाठी आज दिवस उत्तम आहे. जे ठरवाल ते कराल. मात्र काही जुन्या मित्रांपासून आज काळजी घ्यावी.

मेष राशी | saam

वृषभ

आज वेगळ्याच चार गोष्टी आयुष्यात घडणार आहेत. स्वतःसाठी आणि इतरांसाठी हात सैल सोडून पैसे खर्च कराल. खर्चाला धरबंद राहणार नाही.

वृषभ | Saam Tv

मिथुन

सोबतीचा करार असल्याप्रमाणे आजचा दिवस आहे. तुमचीच तुम्हाला सोबत आणि संगत आज भावेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कुटुंबीयांच्या बरोबर आनंदी क्षण खर्च कराल. सहवासाचे सुख लाभेल. आर्थिक व्यवहारांमध्ये मनाजोगा बदल होईल.

कर्क राशी | saam

सिंह

जिद्द आणि चिकाटी हे गुण आपल्या राशीचे जणू कणा आहेत. वेगळे सांगण्याची गरज नाही.

सिंह राशी | saam

कन्या

बेहिशोबी कोणतेच व्यवहार आपल्याला आवडत नाहीत. झालेल्या गोष्टींचा विचारही अधिक कराल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

संतती हीच संपत्ती आहे हे आपल्याला कळून चुकले आहे. अवघड असणाऱ्या गोष्टी आज लीलाया पार पाडाल. लक्ष्मीप्राप्तिसाठी उत्तम योग आहेत.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

रोग, आजार जणू काही पाचवीला पुजले आहेत अशा काही गोष्टी आज तुम्हाला वाटून जातील. परिस्थितीशी दोन हात आपल्याला आज करावा लागेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

जोडीदाराचे मन जपण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. दिवस संमिश्र आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

सासरवाडीकडून धन योगाचे लाभ दिसत आहेत. अचानक घबाड मिळाल्यासारखे पैसे आज आपल्याला मिळतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

मनाचा कोपरा आज भारलेला असेल. भगवंताच्या भेटीसाठी विशेष ओढ वाटेल. आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचा आनंद लुटाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

अनेक दगडींवर पाय ठेवून जाल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आज सकारात्मक वृद्धी होणार आहे. कर्माचा लेखाजोखा चांगला राहील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: मुंबईपासून फक्त ५० किमीवर वसलाय सुंदर निसर्ग, मुलांसोबत पिकनिकसाठी बेस्ट स्पॉट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gandhi Park | google
येथे क्लिक करा