Sugarcane Juice: उसाचा रस पिताय? वाचा कोणत्या रूग्णांनी पिऊ नये

Surabhi Jayashree Jagdish

उसाचा रस

उसाचा रस हा उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं पेय आहे. मात्र, तो सर्वांसाठी सुरक्षित असेलच असं नाही. काही विशिष्ट आरोग्याच्या समस्यांमध्ये उसाचा रस पिणं टाळणं किंवा मर्यादित करणं गरजेचं असतं.

sugarcane juice benefits

मधुमेहाचा त्रास

उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी तो टाळावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा.

sugarcane juice side effects

लठ्ठपणा

उसाचा रसात कॅलरीज असतात. त्यामुळे तो वजन वाढीला कारणीभूत ठरू शकतो. नियमित सेवन केल्यास शरीरात चरबी वाढू शकते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्यास हा रस पिऊ नये.

summer drinks health

पोटाचे विकार

अस्वच्छ ठिकाणी बनवलेला रस प्यायल्यास पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. पचनसंस्था कमकुवत असलेल्यांनी हा रस पिऊ नये. त्यामुळे स्वच्छता तपासूनच सेवन करावं.

सर्दी-खोकला

उसाचा रस थंड असल्यामुळे सर्दी-खोकल्याची लक्षणं वाढू शकतात. शरीरात कफ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आजाराच्या काळात तो टाळणं योग्य आहे.

diabetes and sugarcane juice

गर्भवती महिला

गर्भधारणेदरम्यान कोणतंही बाहेरील पेय पिताना काळजी आवश्यक असतं. अस्वच्छ रसामुळे इन्फेक्शनग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

weight gain drinks

किडनी आणि लिव्हरच्या समस्या

या अवयवांवर ब्लड शुगर वाढली की त्रास होतो. अशावेळी जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्यास परिस्थिती बिघडू शकते.

natural sugar drinks

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा