Dhanshri Shintre
दाट आणि मोकळे केस आकर्षक असतात, पण त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य काळजी आणि नियमित देखभाल करणे गरजेचे आहे.
केस मोकळे सोडून झोपल्यास केस गोंगटतात, तुटतात आणि त्यांचा आरोग्य खराब होतो, त्यामुळे झोपताना केस व्यवस्थित बांधणे गरजेचे आहे.
झोपताना केस उशिला घासल्यास ते तुटण्याची शक्यता वाढते, त्यामुळे केसांची सुरक्षितता राखण्यासाठी सावधगिरीने हाताळणे आवश्यक आहे.
सकाळी उठल्यावर केस गुंतलेले असतात; विंचरताना काळजी न घेतल्यास ते जास्त गळतात आणि केस कमजोर होतात.
स्काल्प ऑयली किंवा खुप कोरडा असल्यास केसांमध्ये खाज आणि अस्वस्थता वाढते, त्यामुळे योग्य स्काल्प केअर गरजेची आहे.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रात्री झोपताना केस हलके बांधणे फायदेशीर ठरते, जे केस तुटण्यापासून आणि गोंगटापासून वाचवते.
केसांवर थोडेसे सीरम किंवा एलोवेरा जेल लावल्यास त्यांना नैसर्गिक ओलावा मिळतो आणि केस मऊ व निरोगी राहतात.
केस मोकळे सोडून झोपणार असल्यास सिल्क किंवा सॅटिनच्या उशीच्या कव्हरचा वापर केल्यास केस गळणे आणि तुटणे कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.