Shruti Vilas Kadam
सिद्धार्थ जाधवने अभिनय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्याला पहिला मोबदला फक्त ₹२०० मिळाला होता. पण या छोट्या सुरुवातीपासून त्यांनी मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
मुंबईच्या शिवडी परिसरातील साध्या कुटुंबात जन्मलेले सिद्धार्थ जाधवने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण घालवले. मात्र त्याने स्वप्न पाहणं थांबवलं नाही.
सिद्धार्थने त्याच्या आई-वडिलांना हवे असलेले सुंदर घर देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्या मते, “आई-वडिलांचा आशीर्वाद हेच माझं खरं संपत्ती आहे.”
‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गोलमाल’ यांसारख्या चित्रपटांमधून आणि अनेक टीव्ही शोमधून त्याने कॉमेडीतून वेगळी छाप निर्माण केली. त्याचा अभिनय लोकांच्या हृदयात घर करून गेला.
सुरुवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. परंतु सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर आज तो मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीतील ओळखीचे नाव झाले आहेत.
संपत्ती, प्रसिद्धी आणि ओळख मिळूनही सिद्धार्थ जाधव आजही साधेपणाने जगतात. तो म्हणतात, “माझी खरी संपत्ती म्हणजे लोकांचं प्रेम आणि कुटुंबाचा आशीर्वाद.”
दीर्घ संघर्षानंतर आज सिद्धार्थ जाधवची एकूण संपत्ती अंदाजे ४१ कोटींवर पोहोचली आहे. यात चित्रपट, जाहिराती, टीव्ही शो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळालेला उत्पन्नाचा मोठा वाटा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.