ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
संस्कृतीचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव संजय बालगुडे आणि आईचे नाव संजीवनी बालगुडे आहे. आज, तिच्या खास दिवशी, तिच्या कारकिर्दीच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
संस्कृती बालगुडेने २०११ मध्ये पिंजरा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर २०१४ मध्ये दोन चित्रपट साइन केले. तिने माकडाचं लगीन या चित्रपटातून पदार्पण केले.
तसेच संस्कृतीने सांगतो आयका या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली. सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित होता.
अभिनयासोबतच संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर तिच्या विविध फोटोशूटसाठीही प्रसिद्ध आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट देत असते.
अलीकडेच एका अनोख्या फोटोशूटने तिच्या चाहत्यांना चकित केले, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे, पण यामध्ये तिने पांढऱ्या गुलाबांचा युनिक टॉप केला आहे.
संस्कृतीला लहानपानापासून अभिनयासोबतच नृत्य आणि चित्रकलेची आवड आहे. ती तिच्या सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ आणि काढलेल्या चित्रांचे फोटो पोस्ट करत असते.
‘मिस्टर वर्ल्ड’ ठाकूर अनुपसिंहचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट ‘बेभान’मध्येही संस्कृतीने साकारली होती महत्वपूर्ण भूमिका. या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
त्यानंतर संस्कृती ८ दोन ७५, आईच्या गावात मराठीत बोल, चौक यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
काही महिन्यांपूर्वी संस्कृतीने आपले लांबसडक काळेभोर केस कापून बॉय कट केला होता. संस्कृतीने हा हेअर कट तिच्या नव्या भूमिकेसाठी केला होता.
झुकेगा नही साला! Pushpa 2 चित्रपटाची छप्परफाड कमाई, आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.