Samosa Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट घरीच बनवा कुरकुरीत आणि चविष्ट समोसा; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

समोशासाठी लागणारे साहित्य

समोशाची कणिक तयार करण्यासाठी मैदा, तेल, मीठ आणि पाणी घ्या. सारणासाठी उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, आले, धणे, जिरे, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कोथिंबीर आवश्यक आहे.

Samosa Recipe

समोशाची कणिक मळा

एका भांड्यात मैदा, मीठ आणि थोडे तेल घाला. हाताने चांगले मिक्स करून त्यात थोडेथोडे पाणी घालत घट्ट कणिक मळून घ्या. कणिक १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.

Samosa Recipe

बटाट्याचे सारण तयार करा

उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. कढईत थोडे तेल गरम करून जिरे, हिरवी मिरची आणि आले परतून घ्या. त्यात बटाटे, मसाले, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

Samosa Recipe

समोशाची पट्टी तयार करा

कणकेचे समान आकाराचे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची पातळ पोळी लाटून ती मधून कापून दोन अर्धगोल तयार करा. एका अर्धगोलाला कोनाचा आकार देऊन त्यात बटाट्याचे सारण भरा.

Samosa Recipe

समोसे व्यवस्थित बंद करा

सारण भरल्यानंतर कणकेच्या कडांना पाण्याचा हलका हात लावा आणि समोसा व्यवस्थित चिकटवून बंद करा. सारण बाहेर येणार नाही, याची काळजी घ्या.

Samosa Recipe

मंद आचेवर तळा

कढईत तेल गरम करा. तेल खूप गरम न करता समोसे मंद ते मध्यम आचेवर तळा. हळूहळू तळल्यामुळे समोसे बाहेरून कुरकुरीत आणि आतून चांगले शिजतात.

Samosa Recipe

चटणीसोबत सर्व्ह करा

तळलेले समोसे टिश्यूवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम समोसे हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा.

Samosa Batata Bhaji Recipe

Weight Loss Tips: एका महिलेने 'हे' 7 पदार्थ खाणं बंद करुन 40 किलो वजन केले कमी, तुम्हीही रोज खाता का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips | Saam Tv
येथे क्लिक करा