Weight Loss Tips: एका महिलेने 'हे' ७ पदार्थ खाणं बंद करुन ४० किलो वजन केले कमी, तुम्हीही रोज खाता का?

Shruti Vilas Kadam

गोड पेये

महिलेने सर्वप्रथम साखरयुक्त आणि गोड पेये पिणे बंद केले. अशा पेयांमधून अतिरिक्त कॅलरीज मिळू शकतात. त्याऐवजी साखर नसलेले लिंबूपाणी, नारळपाणी किंवा ग्रीन टीचा पर्याय निवडला.

juice | pintrest

व्हाइट ब्रेड

व्हाइट ब्रेडऐवजी तिने आहारात संपूर्ण गव्हाची किंवा मल्टीग्रेन ब्रेडसारखे पर्याय निवडले. व्हाइट ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात.

WHITE BREAD | Google

चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्स

चिप्स आणि पॅकबंद स्नॅक्समध्ये मीठाचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे तिने हे पदार्थ टाळून भाजलेले मखाणे, चणे किंवा मर्यादित प्रमाणात नट्स खाण्याला प्राधान्य दिले.

Homemade Potato Chips recipe | ai

फास्ट फूड आणि बर्गर

वजन कमी करण्यासाठी तिने फास्ट फूड आणि बर्गर खाणे बंद केले. त्याऐवजी घरचे जेवण, पनीर सँडविच किंवा होल-व्हीट रॅपसारखे पर्याय निवडले.

health | Canva

आईस्क्रीम

आईस्क्रीममध्ये साखर आणि डेअरीचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे तिने आईस्क्रीमऐवजी ग्रीक योगर्ट आणि फळे, फ्रोजन बनाना स्मूदी किंवा मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेटचा पर्याय निवडला.

Set the ice cream | pinterest

अल्कोहोल

महिलेने अल्कोहोलचे सेवनही बंद केले. अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्याऐवजी साखर नसलेले स्पार्कलिंग वॉटर किंवा लिंबूपाणी यांसारखे पर्याय निवडता येतात.

Navratri | google

प्रोसेस्ड फूड

पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे तिने असे पदार्थ टाळून अंडी, टोफू, पनीर, दही, डाळी आणि इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला.

Processed Food Side Effect

रक्षाबंधनसाठी करा स्पेशल लूक, हातावर काढा या नव्या मेहेंदीच्या खास डिझाईन्स

Mehndi Designs 2026
येथे क्लिक करा