Shruti Kadam
एका जाड बुडाच्या भांड्यात १ लिटर फुलक्रीम दूध उकळायला ठेवावे व मध्यम आचेवर सतत हलवत दूध अर्ध्यावर येईपर्यंत आटवावे.
दूध तळाला लागू नये म्हणून सतत ढवळत राहणे आवश्यक आहे. दूधाच्या बाजूला लागलेल्या सायीसुद्धा भांड्याच्या आत ढकलत राहावी.
दूध आटल्यावर त्यात १/२ कप साखर, १ चमचा बारीक कापलेला बदाम, पिस्ता व काजू घालावेत.
चव वाढवण्यासाठी थोडी वेलदोडा पूड (१/२ चमचा) रबडीमध्ये मिसळावी.
केशराचे धागे थोड्या गरम दुधात भिजवून रबडीमध्ये घालल्यास सुंदर रंग आणि सुगंध येतो.
रबडी पूर्णपणे थंड होऊ द्यावी. ती थंड झाली की घट्ट होते व अधिक चवदार लागते.
थंड रबडीवर थोडे ड्रायफ्रूट्स पसरवून सर्व्ह करावी. खास प्रसंगांसाठी ही एक खास मिठाई आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.