ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला येत असतात. हा गणपती खूप वर्षांपासूनचा मानकरी आहे.
आता बाप्पांचा परतिचा प्रवास सुरू झाला आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मोठ्या थाटात निघाले आहेत. साम टीव्ही च्या प्रेक्षकांसाठी या रथाचे ताजे फोटो आले आहेत नक्कीच पाहा.
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे.
यंदा दगडूशेठ बापाची मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.
यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे.
रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत.
या रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. भाविक प्रंचड गर्दी करून बाप्पाचे दर्शन घेत आहेत.
NEXT: Titeeksha Tawde: मराठमोळ्या साजशृगांरात सजली तितीक्षा तावडे; PHOTO पाहा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.