Kalkarai Climbing : ३ वर्षीय मावळ्यानं सर केला ‘कळकराई’ सुळका; चित्तथरारक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो बघा

Alisha Khedekar

‘कळकराई’ सुळका

सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पुणे आणि रायगडच्या सीमेवर असलेल्या ढाकभैरी किल्ल्याच्या शेजारी ‘कळकराई’ नावाचा सरळ सुळका आहे. हा सुळका १८० फूट उंच आहे.

Kalkarai Pinnacle Climbing | Saam Tv

३ वर्षाच्या लेकराची कमाल

पुण्याच्या राजगड तालुक्यातील वांगणी गावच्या अवघ्या ३.५ वर्षांच्या आश्वथ विकास फडतरे या चिमुकल्याने,सह्याद्री पर्वतरांगांतील अवघड कळकराई सुळक्यावर यशस्वी चढाई केली.

Kalkarai Pinnacle Climbing | Saam Tv

मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली ‘कळकराई’ पार

सुळक्यावर चढताना दोरखंड आणि अनुभवी मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करून त्याने वळणावळणाच्या दगडातून अत्यंत अवघड अशी चढाई पार केली.

Kalkarai Pinnacle Climbing | Saam Tv

अभिमानस्पद कामगिरी

अत्यंत कमी वयात अशी साहसी कामगिरी करणे ही मोठी अभिमानाची बाब मानली जात असून, या धाडसाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

धाडस आणि जिद्दीची कमाल

सुमारे १०० ते १५० फूट उभा खडक पार करणे हे मोठ्यांसाठीही आव्हानात्मक मानले जाते. अशा कठीण परिस्थितीत आश्वथने दाखवलेले धाडस, जिद्द आणि आत्मविश्वास विशेष कौतुकास्पद आहे.

Kalkarai Pinnacle Climbing | Saam Tv

चिमुकल्या मावळ्याचं कौतुक

अत्यंत अवघड आणि थरारक चढाई अगदी सहजतेने पार केल्याने. वांगणी गावासह राजगड तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, राजगडच्या ह्या चिमुकल्या मावळ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Next: उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा पोह्यांचा चटपटीत चिवडा, महिनाभर टिकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalkarai Pinnacle Climbing | Saam Tv
येथे क्लिक करा