Siddhi Hande
लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांमध्ये नेहमी काहीतरी चटपटीत खायला लागते.
तुम्ही घरी पोह्यांचा चिवडा बनवून ठेवू शकतात. हा चिवडा मुले कधीही खाऊ शकतात.
पोह्यांचा चिवडा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.
पातळ पोहे, तेल, शेंगदाणे, डाळीव, सुके खोबरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, मसाला, गोडा मसाला, पिठीसाखर
सर्वात आधी तुम्हाला पातळ पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. पोहे कडक झाले असावे.
यानंतर कढईत तेल गरम करायचे आहे. त्यात सर्वात आधी शेंगदाणे, खोबरे आणि डाळीव वेगवेगळे तळून घ्या.
यानंतर पोह्यात शेंगदाणे, खोबरं आणि डाळीव मिक्स करा.
यानंतर तेलात मोहरी, कढीपत्ता, हळद, हिंग आणि मसाले टाका. गोडा मसाला टाकून फोडणी द्या.
यानंतर ही फोडणी पोह्यांवर टाका. यानंतर पोहे मिक्स करा. यात आवश्यकतेनुसार मीठ टाका आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करा.
Next: कारल्याचे कुरकुरीत भजी कसे बनवायचे? सोपी रेसिपी लगेच करा ट्राय