Surabhi Jayashree Jagdish
भात हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. पण तो कसा शिजवला जातो यावर तो किती आरोग्यदायी आहे हे ठरतो. कुकरमध्ये शिजवलेला भात आणि पातेल्यात शिजवलेला भात यामध्ये काही महत्त्वाचे फरक असतात.
योग्य पद्धतीने भात शिजवल्यास तो अधिक हलका, पचायला सोपा आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे भात शिजवण्याची योग्य पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे.
कुकरमध्ये भात लवकर शिजतो आणि वेळेची बचत होते. या पद्धतीत पाण्याचं प्रमाण कमी असल्याने काही पोषक घटक भातात टिकून राहतात. मात्र जास्त शिजल्यास भात चिकट होऊ शकतो आणि पचायला थोडा जड पडू शकतो.
पातेल्यात भात शिजवताना जास्त पाणी वापरलं जातं आणि नंतर ते पाणी काढलं जातं. त्यामुळे भातातील अतिरिक्त स्टार्च कमी होतो आणि भात हलका होतो. हा भात पचायला सोपा असल्यामुळे आरोग्यासाठी अधिक चांगला मानला जातो.
भातातील स्टार्च जास्त असल्यास तो लवकर पचतो आणि रक्तातील साखर वाढवू शकतो. पातेल्यात शिजवताना अतिरिक्त स्टार्च पाण्यासोबत बाहेर पडतो. त्यामुळे डायबेटीस असणाऱ्या लोकांसाठी ही पद्धत अधिक फायदेशीर ठरू शकते.
वजन कमी करायचं असल्यास पातेल्यात शिजवलेला भात अधिक चांगला पर्याय आहे. कारण त्यात कॅलरीज आणि स्टार्च तुलनेने कमी असतात. त्यामुळे तो खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन नियंत्रणात राहते.
पातेल्यात शिजवलेला भात पचनासाठी अधिक हलका असतो. कारण त्यातले जड घटक आणि अतिरिक्त स्टार्च कमी झालेले असतात. त्यामुळे ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी ही पद्धत वापरावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.