Todays Horoscope: आजच्या 'या' राशींच्या व्यक्तींना विनाकारण फटका बसण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज नारळी पौर्णिमा.आजच्या दिवसाची केलेल्या पूजा आणि व्रते ही विशेषत्वाने उत्तम फलित देतात. विष्णू उपासना करावी.

वृषभ

आपल्या राशीला पैशाचे विशेष महत्त्व आहे. त्याच्यासाठी विशेष कष्ट आणि मेहनत आज घ्याल. मात्र वाम मार्गातील पैसे मिळवणे आज टाळा.

मिथुन

नवनवीन कल्पना आणि संकल्पना यांनी भरलेला आजचा दिवस आहे. व्यावसायिक जोडीदाराबरोबर काही महत्त्वाचे निर्णय होतील.

कर्क

जलतत्त्वाची आपली रास विशेष भावनिक सुद्धा आहे. आज नारळी पौर्णिमेनिमित्त संकल्प करून पाण्याजवळ देवतांचे उपासना केल्यास अधिक फळ मिळेल.

सिंह

आपण न ठरवता काही गोष्टी होतात म्हणजेच कुठेतरी आपल्याला देवाचं उत्तम आशीर्वाद आहेत. हे आज तुम्हाला जाणवेल.

कन्या

हिशोब करून पुढे जाणे आज बरे राहील. आपल्या जवळच्या व्यक्तींकडून याबाबतीत सहकार्य मिळेल.

तूळ

पर्यटन ही आपल्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. आज कामाबरोबर हा आनंद सुध्दा लुटाल.जवळचे प्रवासही घडतील.

वृश्चिक

नाती जोडताना कोणतीही फायदा आपण विचारात न घेता त्यांच्यासोबत असता. आज याचाच तुम्हाला फायदा होईल.

धनु

नवे संकल्प करणे. व्यायाम, शरीरसंस्था जपणे याकडे आज तुमचा विशेष कल राहील. स्वतःच्या आनंदासाठी अनेक गोष्टी कराल.

मकर

नको तिथे पैसे खर्च करणे आज टाळलेले बरे. विनाकारण काहीतरी फटका बसण्याची आज शक्यता आहे. मनस्थिती सांभाळा.

कुंभ

मैत्रीमध्ये सौहार्दाने वागाल. कामाच्या ठिकाणी काहीतरी संशोधनात्मक घडामोडी आपल्याकडून घडतील.

मीन

प्रेमामध्ये अडथळे येण्याचा संभव आहे. पण कुटुंबीयांच्या सहकार्याने मनस्थितीवर मात कराल. कार्यक्षेत्रामध्ये विशेष बाजी आज आपण मारणार आहात.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा