Kenjalgad Fort: महाराष्ट्रातला एकमेव किल्ला! ५५ कातळ पायऱ्या, चौकोनी नाही तर 'असा' अनोखा आकार; काय आहे केंजळगडाच्या रहस्याची कहाणी?

Surabhi Jayashree Jagdish

साताऱ्यातील महादेव डोंगररांगेत वसलेला गड

केंजळगड हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात महादेव डोंगररांगेच्या मांढरदेव फाट्यावर वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून गडाची उंची सुमारे ४,२६९ फूट आहे. वाईपासून हा किल्ला साधारण ११ मैल म्हणजेच सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असल्याची नोंद महाराष्ट्राच्या गॅझेटिअरमध्ये आहे.

Kenjalgad Fort Satara | saam tv

गडाची रचना

केंजळगडाचा आकार इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे सरळ चौकोनी किंवा आयताकृती नाही. उपलब्ध वर्णनानुसार गडाचा आकार रॉम्बॉइड म्हणजे समभुज चौकोनासारखा असून काही नोंदींमध्ये त्याला अनियमित अंडाकृती स्वरूपाचाही उल्लेख आहे. दूरून पाहिल्यावर गडाचा उंच कातळकडा सपाट माथ्यावर एखाद्या टोपीसारखा उठून दिसतो.

Kenjalgad Fort Trek | saam tv

बांधकामाचा इतिहास

केंजळगडाची निर्मिती पन्हाळ्याच्या शिलाहार राजा भोज द्वितीय याच्या काळाशी जोडली जाते. त्याचा कालखंड साधारण बाराव्या शतकात येतो. त्यामुळे गडाला मध्ययुगीन इतिहासाची पार्श्वभूमी लाभली आहे. पुढील काळात हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि १६७४ मध्ये मराठ्यांनी तो जिंकून घेतला.

Kenjalgad 55 Steps | saam tv

छत्रपती शिवरायांनी कधी गड जिंकला?

वाई आणि भोर परिसरातील अनेक किल्ले आधीच मराठ्यांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड आदिलशाहीच्या ताब्यात राहिला होता. चिपळूण मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक चाल करून हा किल्ला जिंकला अशी ऐतिहासिक नोंद आहे. २४ एप्रिल १६७४ रोजी झालेल्या या मोहिमेत आदिलशाही किल्लेदार गंगाजी विश्वसराव किरदत मारला गेला आणि गड मराठ्यांच्या ताब्यात आला.

Kenjalgad Shivaji Maharaj | saam tv

५५ पायऱ्यांचं वैशिष्ट्य

केंजळगडावर जाणाऱ्या मार्गातील कातळात खोदलेल्या पायऱ्या या गडाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहेत. मराठी विश्वकोशानुसार, अखंड कातळात खोदून तयार केलेल्या ५५ पायऱ्यांचा जिना गडाच्या माथ्याकडे घेऊन जातो. या रुंद आणि प्रशस्त पायऱ्या पाहिल्यावर तत्कालीन काळातील दुर्गबांधणीतील कौशल्याची कल्पना येते.

Kenjalgad Fort 1674 | saam tv

ब्रिटिशांच्या काळात पाण्याच्या टाक्यांचं नुकसान

केंजळगडावर पूर्वी मोठ्या आणि लहान अशा अनेक पाण्याच्या टाक्या होत्या. ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर या टाक्यांच्या काठांना नुकसान करून त्यातील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली अशी नोंद उपलब्ध आहे.

Shilahara Dynasty | saam tv

संदर्भ

या लेखासाठी महाराष्ट्र सरकारच्या The Gazetteers Department – Satara, मराठी विश्वकोशातील केंजळगडाची नोंद आणि उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेतला आहे. किल्ल्याचा आकार, उंची, पायऱ्या आणि इतिहास याबाबत शक्य तितकी अधिकृत व विश्वसनीय माहिती प्राधान्याने वापरण्यात आली आहे.

Wai Taluka Forts | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Castor oil home remedies | saam tv
येथे क्लिक करा