Priya More
पावसाळा हा सर्वांना आवडतो पण या दिवसांत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
पावसाळ्यात जीन्स सुकत नाही त्यामुळे अनेक जण वैतागतात. पण तुम्ही पाण्याचा वापर न करता जीन्स स्वच्छ करू शकता.
पाण्याचा एक थेंबही न वापरता तुम्ही घरच्या घरी जीन्स स्वच्छ करू शकता.
जीन्सवर डाग पडले असतील तर टूथब्रश घ्या त्यावर डिटर्जंट घ्या. डाग असलेल्या भागावर ते लावा आणि घासा. नंतर ओल्या कपड्याने ते पुसून घ्या.
तुमच्या जीन्सवर जेवणाचे डाग पडले असतील तर ओला नॅपकिन घेऊन ते जीन्सवर चोळा. नॅपकिनमध्ये असलेले जेल डाग घालवण्यास मदत करते.
जीन्स ओली झाली असेल तर तुम्ही इस्त्रीचा वापर करून ती सुकवू शकता. इस्त्री गरम करून ओल्या भागावर फिरवा.
जीन्सला घाणेरडा वास येत असेल तर बेकिंग सोडा टाकायचा. तो तसाच एक तास तसाच ठेवा. नंतर बेकिंग सोडा पुसून काढा. तो कपड्याची दुर्गंधी दूर करतो.
जीन्सला येणारा वास सौम्य असेल तर जीन्सवर व्हाइट व्हिनेगर स्प्रे करा. त्यामुळे तुमची जीन्स स्वच्छही होईल आणि दुर्गंधी दूर होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.