Surabhi Jayashree Jagdish
डाळ थेट शिजवण्याऐवजी ती स्वच्छ पाण्यात किमान ३ ते ४ वेळा धुवावी. त्यामुळे डाळीवरील धूळ, घाण आणि पॉलिशचे अवशेष निघून जाण्यास मदत होते. स्वच्छ धुतलेली डाळ आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आणि पौष्टिक ठरते.
डाळ शिजवण्यापूर्वी किमान दोन तास स्वच्छ पाण्यात भिजवणे योग्य ठरते. भिजवल्यामुळे डाळ मऊ होते आणि शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो. यामुळे तिचं पचनही तुलनेने अधिक उत्तम होतं.
डाळ भिजवल्याने त्यातील फाइटिक अॅसिड सारखे पोषक (anti-nutrients) घटक कमी होतात. त्यामुळे शरीराला डाळीतील प्रोटीन आणि इतर काही खनिजांचं शोषण अधिक चांगल्या प्रकारे करता येते.
डाळ भिजवल्यानंतर अनेकजण ते पाणी फेकून देतात मात्र पोषणतज्ज्ञांच्या मते तसं करू नये. भिजवताना काही पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वांचे अंश त्या पाण्यात राहू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास त्याच पाण्यात डाळ शिजवल्यास पोषक घटकांचा अधिक फायदा मिळू शकतो.
भिजवण्यासाठी वापरलेलं स्वच्छ पाणीच डाळ शिजवण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पाण्यात राहिलेले काही पोषक घटक अन्नातच राहतात. परिणामी डाळ अधिक पोषक स्वरूपात खाल्ली जाऊ शकते.
डाळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. नियमित प्रमाणात डाळ खाल्ल्याने संतुलित आहाराला चांगली साथ मिळते. विशेषतः शाकाहारींसाठी डाळ हा प्रोटीनचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो.
डाळीतील फायबर आणि प्रोटीन पोट जास्त वेळ भरल्याची भावना देण्यास मदत करतात. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता कमी होऊन वजन नियंत्रणास मदत मिळू शकते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत डाळीचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.