Pune Tourism: पावसाळा जवळ आलाय! हिरवळ, धबधबे आणि धुक्याचा आनंद घ्यायचा असेल तर पुण्याजवळील ही 5 ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पुण्याच्या आसपास पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. हिरवेगार डोंगर, पावसाच्या सरी आणि धुक्याने भरलेले वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळे वीकेंडला जवळपासची ट्रिप प्लॅन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.

Pune weekend trip | saam tv

पुण्याजवळील ठिकाणं

पुण्यापासून जवळ अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही वनडे ट्रिप करू शकता. पावसाळ्यात याठिकाणी निसर्गाचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.

Pune weekend trip | saam tv

खडकवासला धरण

खडकवासला धरण पुण्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. धरण परिसरातील पाण्याचं विस्तीर्ण दृश्य मनमोहक असतं. संध्याकाळच्या वेळेला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण भेट देतात.

Khadakwasla Dam tourism | saam tv

पानशेत धरण

पानशेत धरण पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात याठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळते. हिरव्यागार डोंगरांच्या सान्निध्यात असलेलं हे ठिकाण शांत वातावरणासाठी ओळखलं जातं.

Panshet Dam travel | saam tv

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हा पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुसळधार पावसात याठिकाणी असंख्य छोटे-मोठे धबधबे आणि दाट धुके अनुभवायला मिळतं. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरतं.

Tamhini Ghat monsoon | saam tv

मुळशी डॅम

मुळशी डॅमचा परिसर पावसाळ्यात हिरवाईने नटलेला दिसतो. डोंगर, तलाव आणि धुक्याचे सुंदर दृश्य याठिकाणी पाहायला मिळतं. शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे.

Mulshi Dam sightseeing | saam tv

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला हा इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मानला जातो. पावसाळ्यात किल्ल्याभोवती दाट धुकं, हिरवळ आणि थंडगार वातावरण अनुभवायला मिळतो. ट्रेकिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी सिंहगड हा पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे.

Sinhagad Fort trekking | saam tv

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha empire food culture | saam tv
येथे क्लिक करा