Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढल्यामुळे कानात बुरशी आणि बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानदुखी, खाज आणि संसर्गाचा धोका वाढतो.
पावसात भिजणे किंवा पोहताना कानात पाणी अडकल्यास 'स्विमर इअर'सारखा संसर्ग होऊ शकतो. यामुळे कानात तीव्र वेदना आणि सूज येऊ शकते.
पावसाळ्यात सर्दी, फ्लू किंवा घशाचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम कानावर होऊ शकतो. यामुळे कानात दाब निर्माण होऊन वेदना जाणवू शकतात.
कान स्वच्छ करण्यासाठी काडी किंवा इअरबडचा वापर केल्यास कानाच्या आतील त्वचेला इजा होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
पावसात भिजल्यानंतर किंवा अंघोळीनंतर कान हलक्या टॉवेलने कोरडे करा. कानात पाणी साचू देऊ नका.
कानदुखीसोबत ताप, पू येणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा तीव्र वेदना होत असल्यास त्वरित कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कानात तेल, लसूण किंवा इतर घरगुती पदार्थ टाकणे टाळा. यामुळे संसर्ग वाढू शकतो. योग्य उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घेणेच सुरक्षित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.