Daily Horoscope: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; वाचा तुमचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराचे काय म्हणणे आहे हे आज ऐकून घेणे गरजेचे आहे. कदाचित मतभेद होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ आहेत.

Mesh | saam tv

वृषभ

कलाकारांना दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. नवनवीन कल्पनेच्या भराऱ्या आज कामात वेगळेपण आणतील. प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

भाग्यकारक घटनांचा कालखंड असा आजचा दिवस आहे. विष्णू उपासना दमदार फळे देणार आहे. मोठे प्रवास होतील.

Mithun | saam tv

कर्क

"नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न" असा काहीसा आज दिवस आहे. काम करायला घेतलं की अडथळे हे ठरलेलेच आहेत.

kark | saam tv

सिंह

जोडीदाराची आरती ओवाळावी लागेल. कितीही केलं तरी "सुसरबाई तुझीच पाठ माऊ" आज तिला समजून घेतल्यास संसारात गोडी गुलाबी राहील.

सिंह | Saam Tv

कन्या

पोटशुळ्चे त्रास, मानसिक ताण, तणाव अशा काही गोष्टी आज वाट्याला येणार आहेत. दिवस संमिश्र आहे.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

प्रेमामध्ये गुलाबी रंग बहरणार आहेत. एक वेगळी उमेद घेऊन कामे कराल. कला, क्रीडा क्षेत्र इतर व्यावसायिक गोष्टींसाठी आजचा दिवस "चेरी ऑन द टॉप" असा असणार आहे.

तूळ | saam tv

वृश्चिक

आपली मंगळ प्रधान असणारी रास. आज जागा खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये विशेष फायदा होईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आपल्या जवळच्या लोकांकडून वेगळीच प्रशंसा शाब्बासकीची थाप मिळाल्यामुळे ऊर भरून येईल. पुढील कामाला उत्तम गती मिळेल.

Dhanu Rashi | Yandex

मकर

"थेंबे थेंबे तळे साचे" ही म्हण आज आपल्याला लागू होणार आहे. पैशाने पैसा जोडा. कामामध्ये व्यस्तता राहील.

मकर | Saam Tv

कुंभ

नवे काहीतरी सातत्याने करण्याचा अट्टाहास आज पूर्णत्वाला जाणार आहे. संशोधनात्मक कार्यात गती मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ | Saam Tv

मीन

व्यवसायामध्ये अडथळे आणि अडचणी येतील. सोप्या गोष्टी अवघड ठरतील. आपल्या राशीला बंधन योग आहेत. काळजी घ्या.

Meen | Saam Tv

NEXT : Burj Khalifa : बुर्ज खलिफा येथील एका फ्लॅटची किंमत किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Burj Khalifa apartment cost | google
येथे क्लिक करा