Alisha Khedekar
पूर्ण आंब्यात व्हिटॅमिन A, C, E आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात.
आंब्यातील साखर नैसर्गिक असल्याने अतिरिक्त साखर घालण्याची गरज नसते, त्यामुळे तो आरोग्यासाठी अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.
पूर्ण आंब्यात फायबर जास्त असतात, जे पचन सुधारतात आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतात.
आमरस मऊ, गोड आणि चविष्ट असल्याने लहान मुलं आणि वृद्धांसाठी खाण्यासाठी सोपा आणि आवडता पदार्थ ठरतो.
आमरस पचायला हलका असतो, त्यामुळे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तो एक चांगला पर्याय मानला जातो.
आमरसात साखर किंवा गूळ घातल्याने कॅलरीज वाढतात, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
आमरस तयार करताना तंतू कमी होतात, त्यामुळे पचनासाठी आवश्यक फायबरचे प्रमाण घटते.
आमरस जास्त खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.