Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळा

उन्हाळा सुरू झाला की सूर्याची तीव्रता वाढते. अशावेळी आणि उकाडा असह्य होतो. या कडक उन्हामुळे लोकांना सतत थंड काहीतरी पिण्याची इच्छा होते. म्हणूनच लोक थंड ड्रिंक्स पितात.

homemade summer drinks

उसाचा रस

थंड पेयांमध्ये उसाचा रस पिण्याकडेही लोकांचा कल असतो. त्याचा गोड आणि थंडावा देणारा स्वाद लोकांना खूप आवडतो.

jaggery drink recipe

बाहेरचा उसाचा रस

प्रत्येक वेळी बाहेर जाऊन उसाचा रस पिणं सोपं नसतं. कधी वेळ नसतो, तर कधी स्वच्छतेबद्दल आपण साशंक असतो. म्हणून घरच्या घरी पर्याय शोधण्याची गरज भासते.

cooling drinks summer

घरच्या घरी सोपा उपाय

आता फक्त ५ मिनिटांत घरच्या घरी उसाच्या रसासारखा स्वाद मिळू शकतो. विशेष म्हणजे यासाठी उस किंवा मशीनची गरज नाही. हा उपाय सोपा आणि झटपट तयार होणारा आहे.

natural drinks

लागणारं साहित्य

या रेसिपीसाठी गूळ, पाणी, पुदीना, लिंबू आणि बर्फ लागतो. चव वाढवण्यासाठी थोडं आलं आणि काळं मीठ घालता येतं. हे सगळं साहित्य घरात सहज उपलब्ध असतं.

detox summer drinks

बनवण्याची पद्धत

सुरुवातीला गूळ पाण्यात नीट विरघळवून गाळून घ्यावा. नंतर त्यात पुदीना, लिंबू, आलं आणि काळं मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवावं. शेवटी बर्फ घालून पुन्हा ब्लेंड केल्यावर रस छान तयार होतो.

sugarcane juice without machine

सर्व्ह करण्याची पद्धत

तयार रस ग्लासमध्ये क्रश्ड आईससोबत सर्व्ह करावा. याचा रंग, चव आणि फेस अगदी बाजारातील रसासारखा वाटतो. घरच्या घरी बनवलेलं हे ड्रिंक तुम्हाला अगदी फ्रेश करतं.

refreshing drinks

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ancient acoustic engineering
येथे क्लिक करा