Makarsankranti Photo : मकर संक्रांतीच्या फोटोसाठी द्या 'या' खास पोजेस

Alisha Khedekar

मकर संक्रांतीला काळ्या साडीत झकास फोटो शूट

मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महिलांनो तयारीला लागलात का? काळ्या रंगाच्या साडीत असा करा सुंदर लूक. फोटोसाठी खास पोझेस पाहा

Makarsankranti Black Saree Poses | Saam Tv

उभी राहून दिलेली पोज

मकर संक्रातीला काळ्या रंगाला खूप महत्त्व असते. या दिवशी महिला सजून सुंदर फोटो काढतात. फोटो काढण्यासाठी भिंतीला किंवा घरातील एखाद्या झोपळ्याला टेकून उभे राहून, मान थोडीशी खालच्या दिशेने करून एक गोड स्मित हास्य द्या.

Makarsankranti saree standing Poses | Saam Tv

हलव्याच्या दागिन्यांसोबत सुंदर पोज

मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांचे विशेष वैशिष्ट्य आहे. या हलव्याच्या दागिन्यांसोबत उठाव फोटो काढायचा असल्यास सरळ न उभे राहता एका बाजूला वळा. त्यानंतर थोडी मान खाली करत नथीला हात लावून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा.

Makarsankranti saree jewellary Poses | Saam Tv

पाळण्यावर बसून पोज

जर तुम्हाला उभं राहून फोटो काढायचे नसतील तर, घरच्याघरी तुम्ही पाळण्यावर बसून देखील फोटो काढू शकता. पाळण्यावर बसून एक हात पाळण्याच्या दोरीला तर एक हात मांडीवर ठेवून फोटो काढा.

Makarsankranti saree simple Poses | Saam Tv

बांगड्यांसोबत पोज

हलव्याने सजवलेल्या सुंदर हातात घातलेल्या बांगड्यांसोबत फोटो काढायचे असल्यास एक हात दुसऱ्या हाताला लावून मुठ हलकी बंद करा. त्यानंतर मान थोडी खालच्या दिशेने करून थोडे तिरपे उभे राहा. यामुळे तुमच्या हातासोबतच इतर दागिने देखील उठून दिसतील.

Makarsankranti saree Poses | Saam Tv

नथीसोबत पोज

पारंपरिक लूक हा नथीशिवाय अपूर्ण आहे. नथीसोबत फोटो काढायचा असल्यास मान थोडी तिरपी करून नथीला एका हाताने पकडा. त्यानंतर कॅमेऱ्यात बघून स्मित हास्य द्या.

Makarsankranti saree Nath Poses | Saam Tv

साईड अँगल फोटो

बऱ्याचवेळा आपल्याला माहित असतं आपला फोटो कोणत्या साईडने छान येतो. जर तुम्हाला एका साईडने पोज द्यायची असेल तर, तिरपे उभे राहा. एक हात हनुवटीला लावून दुसरा हात कोपराला लावा. एका साईडला बघून स्मित हास्य द्या.

Makarsankranti saree side angle Poses | Saam Tv

कँडिड फोटो पोज

मुलींना आणि महिलांना कँडिड फोटो काढायला फार आवडतात. अशा पद्धतीने फोटो काढण्यासाठी केसांना हवेत उडवा. थोडे तिरके उभे राहून कॅमेऱ्याकडे पहा. या पोज मध्ये तुमचा फोटो खुलून दिसेल.

Makarsankranti saree candid Poses | Saam Tv

पूजेच्या सामानासोबत पोज

मकर संक्रांतीला एक मडकं सजवलं जातं त्याला सुगडं असे म्हणतात. हे सुगडं ताटात ठेवून त्याच्यासोबत सुंदर फोटो काढण्यासाठी हातात सजवलेलं ताट घ्या. एका पायरीवर बसा त्यांनतर एका साईडला बघून सुंदर हसा.

Makarsankranti-saree-Poses with puja thali | Saam Tv

साधी पोज

फोटो काढताना एकदम साधी पोज द्यायची असल्यास थोडे तिरपे उभे राहा. त्यांनतर एक हात कंबरेवर ठेवून चेहऱ्यावर स्मित हास्य द्या. शिवाय कॅमेऱ्याकडे न बघता बाजूला पहा.

Simple Makarsankrant Pose | Saam Tv

हेही वाचा

येथे क्लिक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

<strong>... तर चांदी एक लाखांनी स्वस्त होणार, तज्ज्ञांचा अंदाज</strong>