Suranache Kaap: जेवणासोबत तोंडी लावायला बनवा सुरणाचे कुरकुरीत काप, ५ मिनिटांत होतील तयार

Siddhi Hande

जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी पदार्थ

जेवणासोबत तोंडी लावायला काही न काही लागतेच. पापड, लोणचं सोडून तुम्ही सुरणाचे काप बनवू शकतात.

Suranache Kaap

सुरणाचे काप

अनेकांना सुरणाची भाजी आवडत नाही. परंतु लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सुरणाचे काप खूप आवडतील.

Suranache Kaap

साहित्य

सुरणाचे बारीक काप, मीठ, आलं-लसूण पेस्ट, रवा, बेसन पीठ, मिरचील लिंबू

Suran

सुरणाची साल काढून घ्या

सर्वात आधी तुम्हाला सुरणाची साल काढून घ्यायची आहे. यानंतर चौकोनी आकारात सुरण कापून घ्यायचे आहे.

Suranache Kaap Recipe | google

मिरची पेस्ट

यानंतर एका ताटात हळद, लिंबाचा रस, मीठ, आलं-लसूण आणि मिरची पेस्ट हे मिक्स करुन घ्या.यामध्ये सुरणाचे काप ठेवा.

रवा

यानंतर एका ताटात रवा, तांदळाचे पीठ, लाल तिखट मिक्स करुन घ्या.

रव्यात छान मिक्स करुन घ्या

रव्यात मॅरिनेट केलेले सुरणाचे काप छान मिक्स करुन घ्या. सर्व बाजूने रवा लागला पाहिजे.

शॅलो फ्राय करुन घ्या

यानंतर तव्यावर तेल टाकून गरम करायला ठेवा. यामध्ये हे सुरणाचे काप शॅलो फ्राय करुन घ्या.

चटणीसोबत खा

सुरणाचे काप तुम्ही पुदीन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. याचसोबत तुम्ही हे चपतीसोबतदेखील खाऊ शकतात.

Kaap Recipe | saam tv

Next: घरच्या घरी फक्त २ मिनिटांत सफरचंदचा रस कसा बनवायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Juice
येथे क्लिक करा