Shruti Vilas Kadam
रविवारी संध्याकाळी जयपूरमध्ये झालेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये 'लापता लेडीज' या चित्रपटाने एकूण १० पुरस्कार जिंकले.
आयफामध्ये 'लापता लेडीज' मधील मुख्य अभिनेत्री नितांशी गोयलने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
नितांशी ही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे.
नितांशी केवळ १७ वर्षांची आहे. नितांशी लहानपणापासूनच चंदेरी दुनियेशी जोडलेली आहे.
नितांशी नववीत असताना 'लापता लेडिज' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि ती १२वीमध्ये गेल्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
नितांशीने २०१६ साली बाल कलाकार म्हणून वयाच्या ९व्या वर्षी 'मन में विश्वास है' या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
नितांशीने 'नागार्जुन: एक योद्धा', 'कर्मफल दाता शनी', 'इश्कबाज', 'दायन', 'पेशवा बाजीराव', 'थपकी- प्यार की' अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
नितांशी, 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'इंदू सरकार', 'हुडदंग' इत्यादी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच तिने 'इनसाइड एज २' या वेब सिरीजमध्येही तिने काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.