Bharat Jadhav
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. गेल्या मोसमात संघाने बेंगळुरूच्या मैदानावर आरसीबीविरुद्ध २८७ धावा केल्या होत्या.
सनरायझर्स हैदराबादने २०२५ च्या हंगामातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात फलंदाजी करत विक्रम केला. इशान किशनच्या शतकाच्या जोरावर संघाने ६ बाद २८६ धावा केल्या.
यानंतर परत तिसऱ्यास्थानी सनरायझर्स हैदराबादचाच संघ आहे. मागील टुर्नामेंटमध्ये घरच्या मैदानावर खेळताना हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या २७२ केली. गेल्या मोसमात या संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध या धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या पाचवी सर्वोच्च धावसंख्येच्या यादीत हैदराबादचं नाव चार वेळा आलंय. गेल्या मोसमात हैदराबादने घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २६६ धावा केल्या होत्या.
ख्रिस गेलच्या १७५ धावांच्या जोरावर आरसीबीने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध २६३ धावसंख्या उभारली होती.
आयपीएलमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने ही मोठी धावसंख्या उभारली होती. पंजाब किंग्सने केकेआरविरुद्ध २६२ धावा करत विजय मिळवला होता.
या सामन्यात हैदराबादने २८७ धावा केल्या होत्या आणि आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध ही धावसंख्या उभारली होती.
आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सनेही २५७ धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.