Manasvi Choudhary
अनेकांना पनीर चिली खायला आवडते. स्पेशल म्हणजे जे नॉन व्हेज खात नाही त्याची आवडती डिश विचारली तर तुम्हाला पनीर चिली असे ऐकायला मिळते.
चटपटीत पनीर चिली रेसिपी ही चवीष्ट लागते. तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने पनीर चिली ट्राय करू शकता.
पनीर चिली बनवण्यासाठी तुम्हाला पनीर, कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, आले- लसूण पेस्ट, मैदा, कॉर्नफ्लोअर, सोया सॉस, चिली सॉस, काळी मिरी पावडर, टोमॅटो सॉस, मीठ, हळद, तेल हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका मोठ्या भांड्यामध्ये मक्याचे पीठ, मिरची आणि मीठ हे मिश्रण एकत्र करा.
या तयार मिश्रणात पनीरचे चौकोनी तुकडे करा आणि मिक्स करा नंतर गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये पनीर तळून घ्या.
तळलेले पनीर एका प्लेटमध्ये काढा पु्न्हा गॅसवर कढईमध्ये तेलामध्ये आले लसूण, कांदा, मिरची,सिमला मिरची परतून घ्या.
संपूर्ण मिश्रण नीट परतल्यानंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, हिरवी मिरची, सिमला मिरची, आले- लसूण पेस्ट मिक्स करा.
नंतर यात तळून घेतलेले पनीर टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घरच्या घरी पनीर चिली तयार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.