Vishal Gangurde
ख्रिसमसच्या दिवशी केकसहित विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.
तुम्ही या दिवशी ड्रायफ्रूट केकचा आस्वाद घेऊ शकता. हा केक बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
एका भांड्यात मैदा चाळून घेतल्यानंतर बेकिंग पावडर, दूध पावडर आणि बेकिंग सोडा मिसळा. तसेच त्यात चिमूटभर मीठ मिसळा.
मिश्रणासाठी दहीचा वापर
दुसऱ्या भांड्यात दही, पीठी साखर आणि तूप घालून हे मिश्रण चांगलं ढवळून घ्या. त्यानंतर मैद्याचे मिश्रण घालून मिक्स करून घ्या.
या मिश्रणाची घट्ट पेस्ट तयार करा. त्या पेस्टमध्ये व्हॅनिला इसेन्स घालून छान मिक्स करा. त्यात बारीक चिरलेले मिक्स ड्रायफ्रूट्स घालायला विसरू नका.
केक बेक करण्यासाठी भांडे घ्या. त्यानंतर, या केकच्या भांड्याला तूप लावून घ्या. या भांड्यात केकचे मिश्रण घाला.
आता या भांड्यात केकचे मिश्रण घाला. या मिश्रणात बदामाचे बारीक काप घाला.
प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर अर्धा तास केक बेक करा. त्यानंतर तुमचा ड्रायफ्रूट केक तयार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.