Manasvi Choudhary
केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केवळ महागड्या उत्पादनांचा वापर पुरेसा नसतो, तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केसांची कशी काळजी घेता हे देखील महत्त्वाचे आहे.
रात्रीची योग्य 'हेअर केअर रुटीन' पाळल्यास केस गळणे कमी होते आणि ते मऊ-चमकदार होतात.
झोपण्यापूर्वी केस कंगव्याने विंचरून त्यातील गुंता काढून घ्यावा. यामुळे टाळूतील नैसर्गिक तेलाचे रक्ताभिसरण सुधारते. गुंता काढून झोपल्यामुळे सकाळी उठल्यावर केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
झोपण्यापूर्वी ५ मि निटे बोटांच्या शेंड्यांनी टाळूवर हलका मसाज करा. मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ वेगाने होते. तसेच यामुळे दिवसभराचा ताण कमी होऊन शांत झोप लागते.
सुती उशीऐवजी सिल्क किंवा सॅटिनच्या उशीचा वापर करणे केसांसाठी वरदान ठरते.
बऱ्याच महिलांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते, पण यामुळे केस उशीवर घासून जास्त गळतात.
रात्री केस धुण्याची सवय असेल, तर ते पूर्णपणे वाळल्याशिवाय झोपू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.