Tubeless tyre: पंक्चर झाल्यावर ट्यूबलेस टायर किती किलोमीटर चालू शकतो?

Surabhi Jayashree Jagdish

ट्यूबलेस टायर

ट्यूबलेस टायर पंक्चर झाल्यावर त्यातील हवा हळूहळू कमी होते. त्यामुळे गाडीचा बॅलन्स टिकवून ठेवता येतो. यामुळे चालकाला सुरक्षित ठिकाणी वाहन नेण्यासाठी थोडा वेळ मिळतो.

Tubeless tire puncture | saam tv

किती किलोमीटर चालवता येतो?

सामान्य परिस्थितीत पंक्चर झालेला ट्यूबलेस टायर सुमारे १० ते ५० किलोमीटरपर्यंत चालू शकतो. मात्र हे निश्चित अंतर नसून परिस्थितीनुसार बदलू शकतं. त्यामुळे जास्त अंतर चालवण्याचा धोका टाळावा.

Tyre puncture | saam tv

अंतर कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते?

पंक्चरचा आकार, टायरमधील उरलेली हवा आणि टायरची एकूण स्थिती यावर किती अंतर चालवता येईल हे ठरतं. लहान पंक्चर असल्यास टायर काही काळ सुरक्षितपणे साथ देऊ शकतो.

Car tyre safety | saam tv

जास्त वेगाने चालवणं टाळा

पंक्चर झालेल्या टायरवर वेगाने वाहन चालवल्यास टायरचं गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे टायरची रिम खराब होण्याचाही धोका वाढतो. त्यामुळे कमी वेग ठेवून अत्यंत सावधपणे वाहन चालवावं.

Puncture repair | saam tv

सुरक्षित ठिकाणी पहिल्यांदा पोहोचा

पंक्चर झाल्यानंतर फक्त जवळच्या सुरक्षित ठिकाणी किंवा पंक्चर दुरुस्ती केंद्रापर्यंतच वाहन नेण्याचा प्रयत्न करा. अनावश्यकपणे लांबचा प्रवास करू नका. शक्य तितक्या लवकर टायर दुरुस्त करून घेणं महत्त्वाचं आहे.

Driving with flat tyre | saam tv

पूर्णपणे हवा गेलेल्या प्रवास करू नका

टायरमधील हवा पूर्णपणे निघून गेल्यानंतर त्यावर गाडी चालवणं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी टायर, रिम आणि सस्पेन्शनलाही नुकसान होण्याची शक्यता असते.

Road safety | saam tv

नियमित तपासणी करा

टायरमधील एअर प्रेशर नियमित तपासल्यास अनेक समस्या आधीच टाळता येतात. वेळोवेळी टायरची तपासणी आणि आवश्यक काळजी घेतल्यास केल्यास त्याचं आयुष्य वाढतं.

Wheel rim damage | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

nerve damage symptoms | saam tv
येथे क्लिक करा