Shruti Vilas Kadam
अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल हिने नुकताच तिचा पारंपरिक देसी लूक शेअर केला असून, तिचा हा अंदाज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
शहनाज हिने पोस्टसोबत आपल्या आगामी पंजाबी चित्रपट ‘इक कुड़ी’ चा ट्रेलर आता रिलीज झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. तिच्या या चित्रपटाची उत्सुकता आधीपासूनच वाढलेली आहे.
तिच्या या देसी लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “क्वीन ऑफ एलेगन्स”, “सो ब्यूटिफुल” अशा कमेंट्सनी तिच्या पोस्टला गाजवले आहे.
काही तासांतच तिच्या पोस्टला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या. तिच्या पारंपरिक पोशाखातील हा लूक तिच्या साधेपणाची आणि सौंदर्याची झलक दाखवतो.
शहनाज गिलचा चित्रपट ‘इक कुड़ी’ येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा मांडेल असं सांगितलं जात आहे.
सध्या शहनाजचा भाऊ शहबाज गिल बिग बॉस 19 मध्ये स्पर्धक म्हणून आहे. शहनाजने त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
देसी लूकमुळे शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आगामी चित्रपटाबाबत आणि नवीन प्रोजेक्ट्सबद्दल आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.