Hair Care Tips: केस सुंदर करण्याच्या नादात हेअर फॉल वाढतोय? 'या' ५ हेअर टूल्सचा वापर करताना घ्या काळजी

Priya More

हेअर स्टाईल

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक तरुणी हेअर स्टाईल करतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर टूल्स वापरले जातात.

Hair Style | Social Media

केसांना हानी पोहचते

हेअर स्टाइलच्या नादात आपण आपल्या केसांची वाट लावून घेतो. या हेअर टूल्समुळे केसांना हानी पोहचते आणि मोठं नुकसान होतं.

Hair Style | Social Media

हीट स्टाइलिंग टूल्स

स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न आणि ब्लो ड्रायर यांसारखी उष्णता देणारी उपकरणे केसांना स्टाईल करण्यासाठी वापरली जातात. पण यामुळे केस खराब होतात.

Hair Style | Social Media

कर्लिंग आयर्न

स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न यामुळे केसातील नैसर्गिंक ओलावा निघून जातो आणि क्यूटिकल्स कमकुवत होऊन केस गळती होते. केस कोरडे आणि निर्जीव होतात.

Hair Style | Social Media

ब्लो ड्रायर

ब्लो ड्रायरमधून बाहेर पडणारी तीव्र गरम हवा थेट टाळूवर आदळते आणि टाळूचा नैसर्गिक ओलावा काढून टाकते. ज्यामुळे कोंडा आणि केसगळती वाढू शकते.

Hair Style | Social Media

हेअर टूल्स

उष्णता देणारे हेअर टूल्स वारंवार वापरणे टाळा. प्रत्येक वापरामध्ये थोडा वेळ द्या. केसांमधील कमी झालेला ओलावा परत मिळवण्यासाठी स्टायलिंगनंतर केसांना डीप कंडिशनिंग करा.

Hair Style | Social Media

रबर बँडचा वापर

केस घट्ट पोनीटेलमध्ये किंवा खूप घट्ट बांधणे टाळा. रबर बँडचा सतत वापर केल्याने ट्रॅक्शन अलोपेसिया होऊ शकतो ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि ते तुटतात.

Hair Style | Social Media

घट्ट वेणी घालणे

दररोज केसांची घट्ट वेणी घालणे टाळा. हलक्या वेण्या आणि सैल पोनीटेल हे उत्तम पर्याय आहेत. रबर किंवा केसांवर ताण देणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे इलास्टिक वापरू नये. त्याऐवजी हलक्या, मऊ कापडी बँडने केस बांधा. सतत एकच केशरचना ठेवणे टाळा.Hair Style

Hair Style | Social Media

मेटलच्या क्लिप्स

मेटलच्या क्लिप्स किंवा जड पिन्स वापरल्याने टाळूवर दाब पडतो आणि केस ओढले जातात. दीर्घकाळ वापरल्यास त्यामुळे टाळू दुखणे, जळजळ आणि केस तुटणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Hair Style | Social Media

प्लास्टिकचे कंगवे

कडक दातांचे प्लास्टिकचे कंगवे वापरणं टाळा. जुने हेअरब्रशसुद्धा वापरणं टाळा. यामुळे टाळूला इजा होऊ शकते आणि केसामध्ये गुंता होऊन ते तुटू शकतात.

Hair Style | Social Media

एक्सटेंशन्स

आजकाल हेअर एक्सटेंशन्सचा वापर केला जातो. यांच्या सततच्या वापरामुळे केसांच्या मुळांवर दाब पडतो. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने केस विरळ होऊ शकतात आणि केसगळती वाढू शकते. त्यामुळे याचा वापर करणं टाळा.

Hair Style | Social Media

NEXT: १ महिना गवती चहा प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health benefits Of Lemongrass Tea
येथे क्लिक करा...