Manasvi Choudhary
गवती चहा हा औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. पावसाळ्यात जर तुम्ही महिनाभर सलग गवती चहा प्यायला तर शरीरासाठी फायदेशीर ठरेल.
गवती चहामध्ये 'सिट्रल' नावाचे घटक असतात जे शरीराची पचनक्रिया सुधरवतात. महिनाभर सतत गवती चहा प्यायल्याने पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या या समस्या कमी होतात.
गवती चहा प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते, किडनीचे कार्य सुधारते.
गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते.यामुळे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. सर्दी- खोकला या आजारांचा धोका कमी होतो.
शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्यामुळे आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते.
जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल किंवा खूप मानसिक तणाव असेल, तर दररोज रात्री गवती चहा प्यायल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.