Shruti Vilas Kadam
अर्धा कप शिजवलेला भात मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात दोन मोठे चमचे दही, एक मोठा चमचा खोबरेल तेल आणि दोन मोठे चमचे कोरफडीचा गर मिसळा. तयार मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. 30 ते 40 मिनिटे ठेवून सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.
शिजवलेल्या भातामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि दहीतील प्रथिने केसांच्या मुळांना पोषण देतात. त्यामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी बनण्यास मदत होते.
खोबरेल तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ते केसांमधील कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ आणि रेशमी बनवते.
कोरफडीतील जीवनसत्त्वे आणि एन्झाइम्स टाळूचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते.
दही आणि कोरफड या दोन्ही घटकांमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे टाळूवरील कोंडा आणि खाज कमी होण्यास मदत मिळू शकते.
या मास्कचा नियमित वापर केल्यास केसांचा राठपणा कमी होतो आणि केस अधिक चमकदार व आकर्षक दिसू लागतात.
दहीतील प्रथिने आणि खोबरेल तेलातील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात, ज्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.